वाचा गैरव्यवहाराविषयी- ‘पोर्टल’ तर आहे पण ‘पवित्र’ असेल का?

Table of Contents

(Last Updated On: January 15, 2018)
1,459 Views

आज आपण सर्वजण वाट पहात आहोत ती महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या MAHA TAIT-2017 परिक्षेनंतर होणाऱ्या प्रक्रियेची…
पण सर्वांना प्रश्न पडलेला आहे की खरचं ही प्रक्रिया पारदर्शक होईल? या पुढची प्रक्रिया ७ वर्षे वाट पाहिलेल्या उमेदवारांना न्याय देईल का ?

ह्यात काळजी निर्माण ह्या मुळे होते कि आतापर्यंत भरती प्रक्रिया अनेकदा भ्रष्टाचारात अडकलेली आपण पहिली आहे.डीएड धारक व बीएड धारक विध्यार्थाच्या आशा पुन्हा एकदा जागृत करण्यात आल्या आहे पण तरीही जोपर्यंत हातात नोकरी मिळत नाही तोपर्यन्त ह्या समस्या धारकांचा जीव टांगणीलाच लागून राहणार हे नक्की आहे . ह्यात मात्र आता एक आशेचा किरण दिसत आहे कारण सरकारने एक पाऊल पारदर्शकतेच्या दृष्टीने पुढे टाकत TAIT परीक्षेच्या उत्तर पत्रिका टाकून त्याविषयी आक्षेप पण मागितले आहे.

आणि हि सर्व प्रक्रिया पवित्र पोर्टलच्या माध्यमातून करण्यात येणार आहे असे वारंवार सांगण्यात येत आहे. मात्र हे पवित्र पोर्टल खरंच पवित्र असेल का? ह्यात गैरव्यवहाराला थारा नसेल ना ह्या बद्दल अजूनही साशंकता आहे.

हे Pavitra पोर्टल काय असेल आणि त्याचा भरती प्रक्रियेत कसा पारदर्शकता आणण्यास कसा उपयोग होईल हे पहायला हवे

  • शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शक पार पडावी यासाठी लवकरच हे portal सुरु करण्यात येणार आहे.
  • हे portal सुरु झाल्यानंतर महाराष्ट्रमधील खाजगी शाळा व सरकारी शाळा ह्या विषयांशी निगडित रिक्त असलेले पदसंख्या जाहिर करतील.
  • नंतरच्या टप्पात उमेदवाराने मग त्याला कितीही मार्क असो त्या संस्थेत apply करावयाचे असेल.
  • ठराविक संस्थेनुसार आलेल्या अर्जांचा गुणानुक्रम लावून पात्र उमेदवारांची यादी जाहीर येईल
  • यानंतर जे जे विद्यार्थी जसे जसे पात्र होतील त्यांची निवड ही पारदर्शक पद्धतीने होईल व् निवड झालेल्या विद्यार्थ्याना त्यांच्या email द्वारे तसेच पोस्टने कळवुन दिलेल्या मुदतीत हजर व्हायला सांगितले जाईल.
  • या प्रकारे एकदा निवड झालेले विद्यार्थी भरती प्रक्रियेतून बाद होतील व उर्वरित जागांसाठी इतर उमेदवारांना संधी मिळेल.

पवित्र पोर्टल प्रणाली बद्दल आमचा अगोदरचा लेख इथे क्लिक करून वाचा  पवित्र पोर्टल प्रणाली

ह्या पूर्वीची भरती प्रक्रिया कशी होती व तिचा शिक्षक भरती वर काय परिणाम होत होता?

पूर्वीची भरती प्रकिया विशेषतः खाजगी संस्थातील हि पारदर्शक क्वचितच होत असावी
पूर्वी होणाऱ्या भरती प्रक्रियामध्ये वेळोवेळी गैरव्यवहार दिसून आला आहे .या गैरव्यवहरामुळे सरकारचे वाभाडे तर निघालेच पण गुणवत्ताधारक शिक्षकही किती मिळाले हा विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण झाला .बरेच खाजगी संस्थाचालक तर donation घेऊन लालेलाल झाले.एखाद्या बाजाराप्रमाणे हा घोड़ेबाजार सुरु झाला व यातून गुणवत्तेकडे दुर्लक्ष केल्या गेले .शिक्षकादेखील भरमसाठ donation देऊन ‘अफाट काम पगार कमी’ ह्या सूत्रात अडकले.

ह्यासर्वावर उपाय म्हणून पवित्र प्रणाली उदयास येत आहे पण तरीही ती ह्या अपेक्षेचे ओझे कितपत पेलवते ते पाहणे गरजेचे ठरते.
ह्यासाठी खालील खबरदारी घ्यायला हवी

  • शासनाद्वारा या प्रक्रियेकडे जातीने लक्ष ठेवले गेले पाहिजे .
  • खाजगी संस्था ज्या जागा रिक्त दाखवत आहे त्या खरोखर आहेत की त्यापेक्षा जास्त आहेत हे पाहणे पडताळून पाहण्यासाठी यंत्रणा विकसित करायला हवी
  • खाजगी संस्थेत अर्ज केलेल्या विद्यार्थ्याना योग्य गुणानुक्रमे घेतल्या जातील ह्यासाठी संस्थांना बंधनकारक तरतुदी करण्यात याव्यात. त्याच बरोबर ह्या प्रक्रियेत आपणही एक जवाबदार उमेदवार म्हणून सतत लक्ष द्यायला हवे.

आम्ही तुम्हाला ह्या बद्दलच्या पुढच्या बातम्या तर कळवत राहूच पण तुम्ही हि तुमच्या कडे असणारी माहिती आम्हाला कळवत राहा. तुमचे मत कंमेंट बॉक्स मध्ये नोंदवले तर आम्हाला आनंदच होईल आणि प्रोत्साहनही मिळेल. आमच्या ह्या पुढील updates मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक वर LIKE करा आणि FOLLOW बटणावर क्लीक करा .

आमच्या updates तुमच्या मोबाइल आणि ई-मेल वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून आमच्या website चे सदसत्व मोफत घ्या…………. [powr-contact-form id=e7ac1613_1515435333869]

 

like us here …click me… धन्यवाद पुन्हा भेटूया : Banak

 

आमच्या इतर पोस्ट इथे वाचा

  1. उत्तरपत्रिकासुची प्रकाशित झाली आहे, पण हे माहित आहे का ?
  2. क्या आपको भी अंग्रेजी से डर लगता है तो इसे जरुर पढे
  3. TAIT EXAM चे मेरीट…..
  4. ‘पवित्र’ पोर्टल प्रणालीची वेब साईट
  5. मेरिट लिस्ट असणार नाही तर भरती प्रक्रिया पूर्ण कशी केली जाईल?
  6. नेमके काय बदलयं?

[powr-hit-counter id=fab5c88e_1515434248909]

 

मित्रांनो हि भरती प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी सतत सतर्क रहा. हि पोस्ट जास्तीत जास्त
मित्रांना पाठवा खालील WhatsApp icon वर क्लिक करुन………………

 

4 thoughts on “वाचा गैरव्यवहाराविषयी- ‘पोर्टल’ तर आहे पण ‘पवित्र’ असेल का?”

Leave a Comment

Your email address will not be published.

Don`t copy text!