Police Bharti Latest Update by SBfied.com

Maharastra Police Bharti 2019 Date

This is an article about: Maharashtra Police Bharti 2019 date will be announced shortly. Total vacancies supposed to be filled are 4765 including Police Shipai and Police Chalak Shipai (driver) as per the latest letter of DG office.

Police Bharti Update: 19 July 2019

नुकतेच सोशल मिडिया वर एक अपर पोलीस महासंचालक यांची स्वाक्षरी असणारे अतितात्काळ परिपत्रक फिरत आहे ह्या परिपत्रकाचा Police Bharti प्रक्रिया 2019 सोबत खूप महत्वाचा संबंध आहे.

ह्या परिपत्रकातून Police Bharti प्रक्रिया 2019 लवकरच राबवली जाणार आहे असे समजते.
दिनांक 19 जुलै 2019 च्या ह्या परिपत्रकाचा विषय Police Bharti 2019 प्रक्रिया राबवणे असा आहे. ह्या अतितात्काळ परिपत्रक बद्दल सविस्तर माहिती खालील प्रमाणे:

Police Bharti प्रक्रिया 2019 परिपत्रकाचा विषय:

ह्या परिपत्रकाचा मुख्य विषय हा Police Bharti प्रक्रिया सन 2019 मध्ये राबवणे हा आहे म्हणजे ह्यामधून Police Bharti परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना भरती प्रक्रिया ह्या वर्षी होण्याचे समजते.

Police Bharti प्रक्रिया केव्हा होणार याबद्दल sbfied.com ह्या पूर्वीच एक सविस्तर पोस्ट प्रकाशित केली होती त्यानुसार Police Bharti ही विधानसभे अगोदर म्हणजे जुलै-ऑगस्ट मध्ये किंवा विधानसभे नंतर म्हणजे डिसेंबर मध्ये होण्याची दाट शक्यता सांगितली होती.
ह्या परिपत्रकाच्या सत्यता पडताळणी नंतर Maharashtra Police Bharti 2019 Date ही डिसेंबर आधी होण्याचीचं शक्यता अधोरेखित झाली आहे. ही पोस्ट तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून वाचू शकता.

Police Bharti 2019: कोणत्या पदांसाठी होणार भरती?:

ह्या परिपत्रकानुसार Police Bharti ही पोलीस शिपाई आणि पोलीस चालक शिपाई ह्या दोन पदांसाठी राबवण्यात येणार आहे.

पोलीस शिपाई आणि पोलीस चालक शिपाई ही दोन स्वतंत्र पदे असून त्यांच्यासाठी पात्रता निकष वेगवेगळे आहेत.

पोलीस शिपाई आणि चालक शिपाई ह्या पदांच्या पात्रता बाबत माहिती वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Police Bharti 2019: Full Information Police Shipai & Police Chalak Shipai

अतितात्काळ परिपत्रक मागचे मूळ कारण:

सन 2008 साली आलेल्या एका विभागीय आदेशानुसार पोलीस खात्याच्या कुठल्याही घटक विभागात पोलीस चालक शिपाई पदासाठी भरती करू नये असे सुचवण्यात आले होते

त्याचा परिणाम म्हणून ह्या मागील 11 वर्षात पोलीस खात्याच्या विविध घटक विभागात ही पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. ह्या मुळे पोलीस खात्याच्या कामकाजात अडथळा निर्माण होत असल्याने ही पदे भरण्यात यावी ह्या साठी हे अतितात्काळ परिपत्रक प्रकाशित करण्यात आले आहे.

Police Bharti 2019 साठी ह्या परिपत्रकाचे महत्व:

ह्या परिपत्रकाचा मुख्य उद्देश हा अपर पोलीस महासंचालक कार्यालयाला अद्ययावत रिक्त पदांची माहिती पाठवणे हा आहे. ह्या माहितीतून संबधित खात्याद्वारा Police Bharti प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

पोलीस शिपायांची रिक्त पदांबद्दल आकडेवारी ह्या पत्रकाद्वारा खालील प्रमाणे समजते.

पोलीस शिपायांची आज रोजी रिक्त पदे, 31.12.2019 पर्यंत एकूण रिक्त होणारी पदे, रिक्त पदामधून पोलीस शिपाई आणि पोलीस चालक शिपाई ह्यांची भरली जाणारी प्रस्तावित पदे यांची आकडेवारी खालील प्रमाणे आहे.

Police Bharti 2019 Vacancy:

Details as mentioned in LetterNumber Of Post
Police Shipai (driver) vacancy4163
Post of Police Shipai supposed to be vacant as on 31.12.194765
No of Post to be filled in Police Bharti 2019 ( Police Shipai)3140
No of Post to be filled in Police Bharti 2019 ( Driver )1625
Vacancy for Police Bharti 2019
(जागा यापेक्षा अधिक वाढू शकतात. )
4765*

Police Bharti अतितात्काळ परिपत्रक बद्दल SBfied View: महत्वाचे

Police Bharti साठी हालचाली वेगाने ( Police Bharti 2019 Date )

19 जुलै 2019 ला सोशल मिडिया वर फिरणारे हे परिपत्रक खात्याअंतर्गत माहिती साठी पाठवलेले आहे त्यामुळे ते महाराष्ट्र पोलीस विभागाच्या संकेत स्थळावर अधिकृत रित्या प्रकाशित केले जाणार नाही मात्र तरीही Police Bharti प्रक्रिया सुरु होण्यासाठी हालचाली वेगाने सुरु असल्याचे ह्यामधून समजते.

महाराष्ट्र पोलीस या अधिकृत website ला भेट देऊन उमेदवारांनी पोलीस भरती बद्दल अधिकृत माहिती घ्यावी. पुढील बटन वर क्लिक करून माहिती घेऊ शकता.

ह्या वर्षी ची Police Bhartiअसणार वेगळी

ह्या परिपत्रकामध्ये स्पष्ट उल्लेख आहे कि पोलीस शिपाई आणि पोलीस चालक शिपाई ह्या दोन पदांकरिता भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यामुळे ह्या मागे मोठ्या प्रमाणात रिक्त असणारे चालक शिपाई हे नवीन पद ह्या भरतीत भरले जाणार आहे.

वाहक परवाना ( Driving Licence) असणार महत्वाचा

हे दोन्ही पदे एकाच भरती साठी भरणार येत असली तरी त्यांच्यासाठी पात्रता निकष वेगवेगळे असणार आहे. पोलीस चालक शिपाई ह्या पदाकरता वाहक परवाना आवश्यक असणार आहे.

आरक्षण असणार वेगवेगळे

ही दोन पदे वेगवेगळी असल्यामुळे त्या त्या पदाच्या भरती साठी स्वतंत्र आरक्षणाचा विचार केला जाणार आहे. ह्या मध्ये बिंदुनामावली बद्दल विशेष आणि अद्ययावत माहिती पुरवण्याची सूचना अपर पोलीस महासंचालक कार्यालय द्वारा करण्यात आली आहे.

Police Bharti 2019 ची तयारी करणाऱ्या उमेदवारांना अधिक संधी:

वाहक परवाना असणाऱ्या उमेदवारांना ह्या वर्षी वाहक शिपायांची पदे भरली जात असल्यामुळे अधिक संधी मिळणार आहे. वाहक शिपाई पदांकरिता मागच्या 11 वर्षाचा अनुशेष भरून काढला जात असल्याने खूप मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे.
Police Bharti 2019 ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाचे

ज्या उमेदवारांकडे वाहक परवाना नाही त्यांनी अजूनही काढून घ्यायला हवा अन्यथा हा परवाना नसणारे उमेदवार ह्या पदांकरिता अर्ज करू शकत नाही.

पोलीस भरती प्रक्रिया मध्ये सतत बदल होत आहे आणि हे बदल तुमच्या पर्यंत लवकरात लवकर पोहचावे म्हणून आम्ही प्रयत्न करत असतो. पण प्रत्येक वेळी आमच्या पोस्ट ची लिंक तुमच्या पर्यंत येईलचं असे नाही. म्हणून आमच्या टेलिग्राम मध्ये सहभागी व्हा आणि पोलीस भरती ची प्रत्येक माहिती सर्वात आधी मिळवा

पोलीस भरती बद्दल तुमच्या काही शंका असतील तर comment box मध्ये नक्की विचारा. जय हिंद.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!