मी तयार आहे का?

12 Views

खाकी वर्दीचे स्वप्न बघताय का?
तो रूबाब हवा आहे का?
जर याचे उत्तर तुम्ही होय असे देत असाल तर जरा थांबा.
उत्तर देण्या च्या अगोदर स्वतःला एक प्रश्न विचारा.
ज्या वर्दिचे स्वप्न मी बघतो आहे ती वर्दी मिळवण्यासाठी लागणारी किंमत मोजायला आम्ही तयार आहे का?

स्वप्न तर सगळेच बघतात.
ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी लढायला मी तयार आहे का?

तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही किंमत तुम्हाला पैशात मोजायची नाहीये.
तो रूबाब मिळवण्यासाठी किंमत तुम्हाला फक्त वेळेत मोजायची नाहीये.

स्वप्न सर्वच बघतात. प्रयत्न सर्वच करतात. वेळ सर्वच देतात. पण म्हणून ती रुबाबदार खाकीवर्दी सर्वांनाच मिळत नाही. सर्वच सर्व करतात मग सर्वांचे स्वप्न पूर्ण का होत नाही?

याचे उत्तर फक्त आणि फक्त एक प्रश्न देऊ शकतो.
रोज सकाळी उठल्यानंतर हा एक प्रश्न स्वतःला विचारा…

माझ्या वर्दीच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी हवी असणारी किंमत द्यायला मी तयार आहे का?
आणि हो
. या प्रश्नाचे उत्तर पटकन हो देण्याऐवजी एक मिनिट स्वतःची विचार करा.

फिजिकल चाचणीचे मिरीट 94 वरती लागण्याची शक्यता आहे आणि मला तितके मार्क मिळवण्यासाठी न थकता न थांबता तयारी करायची आहे.
मी तयार आहे का?
उत्तर हो मिळाले.
आता पुढचा विचार करा..

94 मार्क मिळवून सुद्धा लेखी परीक्षेला 90 मार्कांची गरज आहे.
लेखी परीक्षेत 90 मार्क मिळवण्यासाठी मी तयार आहे का?

मित्रांनो मी तयार आहे का या प्रश्नाचे उत्तर हो देण्याआधी स्वतःशी नेहमी विचार करा.
मी फक्त हो म्हणून स्वतःला फसवत तर नाही ना?

जोपर्यंत मी तयार आहे का या प्रश्नाचे उत्तर ठामपणे हो मिळत नाही तोपर्यंत प्रयत्नात थांबवू नका.

अशाच जिद्दीने मेहनतीने वर्दी चे स्वप्न पूर्ण करणाऱ्या भावी पोलिसांचे ऑनलाइन सर्वेक्षण चालू आहे. खालील लिंक वर क्लिक कर तुम्ही त्या सर्वेक्षण मध्ये सहभागी होऊ शकता…

Mr.Sagar B Tupe Patil
SBfied Academy
Police Bharti.
9049030707

सर्वेक्षण मध्ये सहभागी होण्यासाठी क्लिक करा खालील लिंक वर… (ज्यांनी एकदा सहभाग घेतला आहे त्यांनी पुन्हा नोंदवू नये)

4 thoughts on “मी तयार आहे का?”

Leave a Comment

Your email address will not be published.

error: हे मजकूर कॉपी होऊ शकत नाही. कृपया शेअर बटणाचा वापर करून शेअर करा !!